ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीसाठी गाळे नोंदणी अर्ज

नियम आणि अटी

१ . गाळ्याचा आकार १० X १०  फूट असेल. प्रत्येक गाळ्यासाठी ३५०० /- (तीन हजार पाचशे रूपये) रक्कम भरावी लागेल. गाळ्यासाठी भरावी लागणारी रक्कम रोख स्वरूपात स्वीकारली जाणार नाही. एका प्रकाशक / वितरकास दोन पेक्षा जास्त गाळे मिळणार नाहीत.

२ . गाळ्यांची सोडत दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता होईल.

३ . दि. २० फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी गाळा लावण्यासाठी ताब्यात देण्यात येईल. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी होईल. दि. २१ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणत्याही वाहनांना (टेम्पो, ट्रक, गाडी, रिक्षा दुचाकी वाहने इत्यादींना) ग्रंथ प्रदर्शन मंडपात प्रवेश देण्यात येणार नाही. 

४ . प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर पूर्ण रक्कम जमा केल्यानंतर व त्याचा पुरावा सादर केल्यानंतरच आपला गाळा आरक्षित होईल.
 
५ . गाळा वाटपाचे सर्व अधिकार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि संयोजक यांच्याकडे राखीव आहेत. 
 
६ . आपल्या गाळ्याची स्वच्छता स्वत: ठेवावी लागेल. त्यासाठी आपणास चार कचर्‍याच्या पिशव्या देण्यात येतील. 
 
७ . गाळेधारकास फक्त पुस्तके, त्यांच्या सीडी विकता येतील. इतर कोणत्याही वस्तू ठेवता व विकता येणार नाहीत. आपणास विक्री करावयाची पुस्तके गाळ्यामध्येच ठेवावी लागतील. बाहेर कोठेही ठेवण्यास परवानगी नसेल.
 
८ . आपल्याला आरक्षित असलेला गाळा इतरांना देता येणार नाही, बदलता येणार नाही आणि इतरांसोबत भागीदारीत वापरता येणार नाही. 
 
९ . आपल्याला मिळालेले साहित्य आणि अतिरिक्त घेतलेले सामान गाळा परत करताना सुस्थितीत परत करावे लागेल. वस्तूंची मोडतोड, गहाळ होणे यासाठी नुकसान भरपाई द्यावी लागेल. 
 
१० . आयोजकांकडून सुरक्षा रक्षकाची व्यवस्था केलेली असली तरी आपल्या साहित्याची चोरी किंवा नुकसान यासाठी आयोजक जबाबदार राहणार नाहीत. त्याची पूर्ण जबाबदारी गाळेधारकाची राहील. गाळ्यातील पुस्तकांचा/सामानाचा विमा करायचा झाल्यास तो गाळेधारकास स्वत: करावा लागेल. 
 
११ . गाळ्यात रात्री झोपण्यासाठी ओळखपत्र असलेल्या एकाच व्यक्तीस परवानगी असेल. 
 
१२ . पुस्तके विक्रीची वेळ सकाळी १०.००  ते रात्री ९ .००  अशी असेल. 
 
१३ . संमेलन काही कारणाने पुढे ढकलले गेल्यास आपली नोंदणी कायम राहील. मात्र नोंदणी रद्द करून शुल्क परत करण्याचे अधिकार आयोजकांकडे असतील. 
 
१४. प्रदर्शन परिसरात अग्निजन्य पदार्थ आणता येणार नाहीत. उदा. शेगडी, हिटर, लाईटर, उदबत्ती, मेणबत्ती, काडेपेटी, गॅस सिलेंडर इत्यादी. आयोजकांकडून मध्यवर्ती अग्निशमन यंत्रणा तयार करण्यात आली आहे. तरीही आपणास अग्निशमन यंत्र  ठेवावे लागेल. 
 
१५. आपल्या गाळ्यात उपस्थित असणार्‍या कर्मचार्‍याजवळ ओळखपत्र, मास्क, सॅनिटाईजर असणे गरजेचे आहे. 
 
१६ . आपला अधिकृत एका कर्मचार्‍यांची माहिती, त्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो व आधार कार्डाची प्रत ग्रंथ प्रदर्शन समितीकडे या अर्जासोबत द्यावी. जेणेकरून ओळखपत्राची व्यवस्था करण्यात येईल. 
 
१७ . प्रती गाळे एका कर्मचार्‍यास नाश्ता/ भोजन कूपन दिले जाईल. एका व्यक्तीच्या अतिरिक्त अन्य व्यक्तींच्या भोजनव्यवस्थेसाठी निर्धारित शुल्क भरून भोजनपास घेता येईल. 
 
१८ . १०० गाळ्यांपैकी काही गाळे साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र शासनाची शासकीय प्रकाशने, संयोजक संस्था यांच्यासाठी राखीव आहेत. 
 
१९ . संमेलनाचा किंवा ग्रंथप्रदर्शनाचा कोणताही नियम भंग केल्यास कारवाई करण्यात येईल. 
 
२० . सर्व वाद दिल्ली न्यायालयाच्या कक्षेत असतील.
 
२१ . ग्रंथप्रदर्शनासाठी गाळ्यांची संख्या १०० (शंभर) एवढी मर्यादित असल्याने फक्त पहिले शंभर अर्ज व पूर्ण रक्कम भरल्याचा पुुरावा मिळालेले गाळे आरक्षित होतील.
 

सर्व नियम व अटींमध्ये अंशतः बदल करण्याचे अधिकार संयोजकांना असतील.