सरहद , पुणे आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५

चला.. देशाची राजधानी दिल्लीत करूया,

मायमराठीचा जागर!

21, 22 आणि 23 फेब्रुवारी 2025

प्रतिक्षा फक्त काही दिवसांची...

दिवस
तास
मिनिटे
सेकंद
स्थळ

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी,
तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली.

।। आपले सहर्ष स्वागत आहे ।।

दिल्लीत जागर मराठीचा… संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा….

एक अपूर्व योग जुळून आलाय… आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर, मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत संपन्न होत आहे. प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद अशी ही बाब.

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना नाही तर आपल्या अस्मितेचा आणि अभिमानाचा विषय आहे, याचा प्रत्यय आपणास या ऐतिहासिक संमेलनातून येणार आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन `सरहद, पुणे`च्या पुढाकारातून याच भावनेतून आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन व त्याच्याशी निगडित सर्व घडामोडी, माहिती आणि संवादासाठी हे संकेतस्थळ आपल्या सेवेत सादर आहे. या माध्यमातून आपणही या ऐतिहासिक साहित्यक्षणांचे साक्षीदार व्हा… त्यात सहभागी व्हा!

अ. भा. मराठी साहित्य महामंडळ आणि सरहद, पुणे

मान्यवरांचे संदेश

संमेलनाची रूपरेषा

२१ फेब्रुवारी २०२५

२२ फेब्रुवारी २०२५

२३ फेब्रुवारी २०२५

टीप: वरील कार्यक्रमांमध्ये आयोजकांकडून बदल केले जाऊ शकतात.