सरहद , पुणे आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५

संमेलन स्थळ

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१, २२ आणि २३  फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नवी दिल्ली येथील सुप्रसिद्ध तालकटोरा स्टेडियम येथे संपन्न होत आहे. संमेलनस्थळी पोहोचण्याच्या विविध मार्गांची माहिती याठिकाणी देण्यात आली आहे .     

नवी दिल्ली रेल्वे स्टेशन पासून तालकटोरा स्टेडियमला पोहोचण्यासाठी मेट्रो मार्ग

  • नवी दिल्ली मेट्रो स्टेशन ते राजीव चौक. (यलो लाईनने प्रवास करणे)
  • राजीव चौक येथे मेट्रो लाईन बदलणे. 
  • राजीव चौक ते रामकृष्ण आश्रम/ आरके आश्रम पर्यंत. (हा प्रवास ब्ल्यू लाईनने करणे)
  • मेट्रो प्रवासाचा एकूण अंदाजित कालावधी- १० ते १५ मिनिटे.
  • रामकृष्ण आश्रम स्टेशनवर उतरून टॅक्सी अथवा बसने तालकटोरा स्टेडियम पर्यंत येणे. अंतर ३.५० किलोमीटर     

हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन पासून तालकटोरा स्टेडियमला पोहोचण्यासाठी मेट्रो मार्ग

  • सराय काले खान ते मयूर विहार फेज-१ (पिंक लाईनने प्रवास करणे)
  • मयूर विहार येथे मेट्रो लाईन बदलणे.  
  • मयूर विहार ते रामकृष्ण आश्रम/ आरके आश्रम पर्यंत (हा प्रवास ब्ल्यू लाईनने करणे)
  • मेट्रो प्रवासाचा एकूण अंदाजित कालावधी-  ३० ते ३५ मिनिटे.
  • रामकृष्ण आश्रम स्टेशनवर उतरून टॅक्सी अथवा बसने तालकटोरा स्टेडियम पर्यंत येणे. अंतर ३.५० किलोमीटर.      

इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून तालकटोरा स्टेडियमला पोहोचण्यासाठी मेट्रो मार्ग

  • एअरपोर्ट टर्मिनल-३ मेट्रो स्टेशन ते शिवाजी स्टेडियम पर्यंत. (ऑरेंज लाईन ने प्रवास करणे)
  • मेट्रो प्रवासाचा अंदाजित कालावधी-  १५ ते २० मिनिटे.
  • शिवाजी स्टेडियम स्टेशनवर उतरून टॅक्सी अथवा बसने तालकटोरा स्टेडियम पर्यंत येणे. अंतर ३.००  किलोमीटर.      

तालकटोरा स्टेडियमपासून जवळची मेट्रो स्टेशन्स

  • रामकृष्ण आश्रम/ आरके आश्रम – (ब्ल्यू लाईन) अंतर ३ .५० किलोमीटर 
  • पटेल चौक (यलो लाईन) अंतर ३ .५० किलोमीटर 

दिल्ली मेट्रो मॅप पाहण्यासाठी आणि तिकीट बुकिंगसाठी DMRC Momentum 2.0 Delhi Sarthi हे ऍप खालील लिंकवरून डाउनलोड करा.