१९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. १९६१ मध्ये पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ, औरंगाबादची मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) आणि नागपूरचा विदर्भ साहित्य संघ ह्या त्यात्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङ्मयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ होय.
वर सांगितलेल्या या महामंडळाच्या चार संस्थापक संस्था असून त्या कायम घटक संस्था मानण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यातील, संपूर्ण प्रदेशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था, तसेच बाहेरील देशांमध्ये त्या संपूर्ण देशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था ह्यांना महामंडळात समाविष्ट करून घेता येते. सध्या महामंडळातील अशा संस्था मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवक मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), मराठी साहित्य परिषद (तेलंगण राज्य), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) आणि मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ (भोपाळ) या सामाविष्ट संस्था आहेत.
महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश या राज्यांत आणि बिदर, बेळगाव इत्यादी गावांत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या ३५० शाखा असून, १२ हजाराच्यावर सभासद आहेत. मराठी साहित्यातील सुमारे ४० हजार कवी साहित्यिकांचे नेतृत्व करणारी ही सगळ्यात मोठी साहित्य परिषद आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी ही परिषद काम करीत असून, लोकसहभागातून संमेलने व विविध उपक्रम राबविले जातात.
वर सांगितलेल्या या महामंडळाच्या चार संस्थापक संस्था असून त्या कायम घटक संस्था मानण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यातील, संपूर्ण प्रदेशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था, तसेच बाहेरील देशांमध्ये त्या संपूर्ण देशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था ह्यांना महामंडळात समाविष्ट करून घेता येते. सध्या महामंडळातील अशा संस्था मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवक मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), मराठी साहित्य परिषद (तेलंगण राज्य), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) आणि मध्य प्रदेश मराठी साहित्य संघ (भोपाळ) या सामाविष्ट संस्था आहेत. याशिवाय संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व न करणाऱ्या साहित्य संस्थेला संलग्न संस्था म्हणून मान्यता मिळते. मराठी वाङमय परिषद (बडोदे) ही अशी संलग्न संस्था आहे. महामंडळावर घटक संस्थेचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, समाविष्ट संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि सर्व संलग्न संस्थांचे मिळून जास्तीत जास्त तीन प्रतिनिधी सभासद असतात.
०१ | प्रा. उषा तांबे | अध्यक्ष | मुंबई |
०२ | श्री. गुरय्या रे. स्वामी | उपाध्यक्ष | कर्नाटक |
०३ | डॉ. उज्ज्वला मेहेंदळे | कार्यवाह | मुंबई |
०४ | श्री. प्रकाश पागे | कोषाध्यक्ष | मुंबई |
०५ | प्रा. मिलिंद जोशी | सदस्य | पुणे |
०६ | सौ. सुनिता राजे पवार | सदस्य | पुणे |
०७ | श्री. राजन लाखे | सदस्य | पुणे |
०८ | डॉ. दादा गोरे | सदस्य | मराठवाडा |
०९ | डॉ. रामचंद्र काळूंखे | सदस्य | मराठवाडा |
१० | प्रा. किरण सगर | सदस्य | मराठवाडा |
११ | श्री. प्रदीप दाते | सदस्य | विदर्भ |
१२ | श्री. विलास मानेकर | सदस्य | विदर्भ |
१३ | डॉ. गजानन नारे | सदस्य | विदर्भ |
१४ | डॉ. विद्या देवधर | सदस्य | हैदराबाद |
१५ | श्री. पुरुषोत्तम सप्रे | सदस्य | भोपाळ |
१६ | श्री. कपूर वासनिक | सदस्य | भोपाळ |
१७ | श्री. रमेश वंसकर | सदस्य | गोवा |
१८ | श्री. संजय बच्छाव | सदस्य | बडोदा |
१९ | श्री. रवींद्र शोभणे | संमेलनाध्यक्ष २०२४-२५ | विदर्भ |