सरहद , पुणे आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५

विश्वकोशातून...

मराठी साहित्य, साहित्यिक, लोकसाहित्य याविषयी मराठी विश्वकोशातील लेखांच्या लिंक्स…  

लोकसाहित्य

 लोकमानसाचे विविध वाङ्‌मयीन, सांस्कृतिक, कलात्मक आविष्कार या संज्ञेने सूचित होतात. ‘फोकलोअर’ या अर्थी मराठीत लोकसाहित्य वा लोकविद्या या संज्ञा रूढार्थाने वापरल्या जातात व त्यांचा आशय कित्येकदा परस्परव्याप्त असल्याचे दिसून येते. पश्चिमेकडे ‘फोकलोअर’ची संकल्पना सर्वप्रथम समाजशास्त्र व मानवशास्त्र यांच्या अभ्यासातून निर्माण झाली…

महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती

मराठी भाषिक प्रदेशातील लोकसाहित्याचे संशोधन, संकलन व प्रकाशन करणारी एक राज्यशासकीय संस्था. स्थापना मार्च १९५६. सर्वसामान्यांच्या भाषेचा व कल्पनाविष्काराचा अभ्यास व्हावा तसेच पारंपारिक कुळाचारांचे स्वरूप कळावे, हाही या समितीच्या स्थापनेमागील एक हेतू आहे. या समितीवर सदस्य म्हणून लोकसाहित्याचे अभ्यासक राज्यशासनातर्फे नियुक्त केले जातात…

मराठी लेखक आणि साहित्य

मराठी साहित्यामध्ये योगदान दिलेल्या साहित्यिकांचा परिचय…