सरहद , पुणे आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे

९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली २०२५

संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणी

प्रवास व्यवस्था

१९ फेब्रुवारी २०२५ रोजी पुण्याहून दिल्लीला जाण्यासाठी एका विशेष रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. परतीचा प्रवास रविवार, २३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री दिल्लीहून पुण्याकडे.
(महाराष्ट्रातील सहभागी साहित्य रसिकांनी शक्यतो आपआपले बुकिंग जेथे शक्य आहे त्या माध्यमाद्वारे करण्याची विनंती आहे.)

निवास व्यवस्था

निवासाची व्यवस्था दिल्ली येथील महाराष्ट्र सदन, जैन भवन, गुरुद्वारा, करोलबाग येथील काही हॉटेल्स तसेच  धर्मशाळा या ठिकाणी करण्यात आली आहे.

प्रतिनिधी शुल्क

महामंडळाने आयोजक संस्थेला ठरवून दिलेले शुल्क याप्रमाणे आहे :

  • सर्वसाधारण हॉलसाठी प्रत्येकी रु. ३५०० /- ( तीन हजार पाचशे फक्त)
  • रूम (२ ते ३ व्यक्तींसाठी) प्रत्येकी रु. ६५०० /- ( सहा हजार पाचशे फक्त)

आपण जमा केलेल्या या प्रतिनिधी शुल्कात प्रस्तुत संमेलनात आपली (फक्त एका व्यक्तीची) दि. २० फेब्रुवारी २०२५ ते दि. २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत केवळ निवास व्यवस्था, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था दिल्ली येथे करण्यात येईल. यात प्रवास व्यवस्था समाविष्ट नाही.

प्रतिनिधी शुल्क जमा करण्यासाठी बँक खात्याचा तपशील

Account Name: 98th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan Delhi
Bank Name: The Cosmos Co-op. Bank Ltd. Dhankawadi Branch
Account Number: 00805010196888
IFSC Code: COSB0000008
MICR No: 411164011

नांव नोंदणीसाठी संपर्क

साहित्य परिषदेच्या सर्व शाखा तसेच गोपाळ कृष्ण गोखले प्रबोधिनी, सरहद पब्लिक स्कूल, स. नं. ६, धनकवडी, पुणे ४११०४३.

प्रतिनिधी नोंदणीची अंतिम तारीख: ०१ फेब्रुवारी २०२५